पोलिस भरतीबाबत मोठा निर्णय, गृह विभागाकडून ५२०० पदांची भरती आदेश काढण्यात आले आहेत.
*
महाराष्ट्र पोलिस दलात लवकरच हजारो पदांची भरती केली जाणार असल्याचा शासन आदेश गृह विभागाने जारी केला आहे.
📌 सामान्य प्रशासन विभागाच्या 5 जुलै 2021च्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार ही भरतीप्रक्रिया राबविण्यात येणार आहे. पोलिस शिपाई, पोलिस शिपाई चालक, कारागृह शिपाई आणि राज्य राखीव पोलिस बल शिपाई, अशा एकूण 12 हजार 200 पदांसाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे.
कर्मचाऱ्यांना चांगली घरे मिळणार
दरम्यान, औरंगाबाद परिक्षेत्राच्या बैठकीत गृहमंत्री वळसे पाटील यांनी कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती आणि गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण, गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण, याबाबत माहिती घेतली. तसेच, कर्मचाऱ्यांना चांगली घरे, चांगल्या सुविधा मिळाव्यात, यावरही चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.
पहिल्या टप्प्यात 31 डिसेंबरपूर्वी 5200 पदांची भरती होणार असून, नंतर टप्प्याटप्प्याने 7 हजार पदे भरली जाणार असल्याची घोषणा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केली होती. त्यानुसार शासन आदेश जारी करण्यात आला आहे.


टिप्पण्या