सोन्याच्या दरात घसरण, चांदीचीही झळाळी उतरली.. गुंतवणुकदारांसाठी सुवर्णसंधी!

सोन्याच्या दरात घसरण, चांदीचीही झळाळी उतरली.. गुंतवणुकदारांसाठी सुवर्णसंधी!
*गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये 'एमसीएक्स'वर सोन्याचा भाव 56,200 रुपये प्रति तोळा होता. आतापर्यंतचा हा सोन्याचा सर्वोच्च दर आहे. त्यानंतर सोन्याच्या दरात घसरण सुरु झाली. सध्याचा काळ सोन्यातील गुंतवणुकीसाठी सर्वात चांगला असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
*सोन्या-चांदीच्या किंमतीत आजही घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. सोन्याचा दर आज 47,340 रुपये प्रति तोळा होते. विक्रमी दरापेक्षा सोन्याचा हा दर प्रति तोळा साधारण 8860 रुपयांनी स्वस्त आहे. 🧈 22 कॅरेट सोन्याचा दर (प्रति तोळा) ▪️दिल्ली - 47,410 रुपये ▪️मुंबई - 47,340 रुपये ▪️चेन्नई - 45,420 रुपये ▪️कोलकाता - 47,660 रुपये ✨ 24 कॅरेट सोन्याचा दर (प्रति तोळा) ▪️दिल्ली - 51,710 रुपये ▪️मुंबई - 48,340 रुपये ▪️चेन्नई - 49,550 रुपये ▪️कोलकाता - 49,760 रुपये 📍 चांदीचे आजचे दर (प्रति किलो) ▪️दिल्ली - 68,400 रुपये ▪️मुंबई - 68,400 रुपये ▪️चेन्नई - 73,200 रुपये ▪️कोलकाता- 68,400 रुपये 🔎 असे तपासा शुद्ध सोने..! सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी सरकारने 'बीआयएस केअर अ‍ॅप' तयार केलेय. त्यावर सोन्याची शुद्धताच नव्हे, तर तक्रारही करता येते. परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळल्यास ग्राहक या अ‍ॅपवर त्वरित तक्रार करू शकतात. तक्रारीवर केलेल्या कार्यवाहीची माहितीही अ‍ॅपवरच ग्राहकांना मिळते.

टिप्पण्या