▪️देशद्रोहाचा कायदा ब्रिटिशांनी महात्मा गांधी आणि टिळक यांच्यासारख्या नेत्यांविरूद्ध वापरला होता, तो रद्द का केला जात नाही? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल, कोर्टाच्या टिप्पणीचे राहुल गांधींकडून स्वागत.
▪️दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याच्या दरात 177 रुपयांची वाढ. सोन्याचे दर 47443 रुपये प्रति तोळा. चांदीच्या दरात किरकोळ 83 रुपयांची वाढ. चांदीचे दर प्रति किलो 68,277 रुपयांवर पोहोचले.
▪️देशात 24 तासांत 41 हजारांहून अधिक नव्या कोरोनाबाधितांची नोंद; तर 581 मृत्यू. राज्यात बुधवारी 8602 कोरोनाबाधितांची नोंद. जगभरात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची सुरुवात होण्याचा टप्पा; संक्रमण वाढण्याचा जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा, डेल्टा वेरिएंट 111 हून अधिक देशांमध्ये पोचला.
▪️Netflix वर चित्रपट बघण्यासोबत खेळता येणार Video Games; पुढल्या वर्षी मिळू शकतो गेमिंगचा पर्याय. इलेक्ट्रॉनिक आर्ट्स आणि फेसबुक कंपन्यांच्या माजी कर्मचारी नेटफ्लिक्समध्ये..
▪️गुरु-शिष्याच्या नात्याला काळीमा, आधी कुटुंबियांना मदत, नंतर प्रेमाच्या जाळ्यात अडकत अरबी भाषेचे शिक्षण देणाऱ्या शिक्षकाचा विद्यार्थीनीवर बलात्कार. नागपूरच्या मानकापूर पोलीस स्टेशन हद्दीतील घटना.
▪️योगींना मोदींचा बूस्टर डोस; वाराणसीतील कार्यक्रमात केली प्रशंसा. कोरोना काळात योगी सरकारच्या प्रयत्नांचा उल्लेख करताना पंतप्रधान मोदींनी योगींच्या कामगिरीची प्रशंसा केली.
▪️विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत दगाफटका होण्याची महाविकास आघाडीला भीती, आघाडीकडून गुप्त मतदानऐवजी आवाजी पद्धतीने मतदान करण्यासाठी नियमांमध्ये बदल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात.
▪️अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील बेलापुरात गुप्तधन सापडले. घराचे खोदकाम करताना हंडाभर चांदीच नाणे सापडले. व्यापारी राजेश खटोड यांनी ही नाणी सरकारजमा केली.
▪️राज्यात कोविडमुक्त गावांमध्येआठवी ते बारावीच्या शाळा सुरु; कठोर नियमांचं करावं लागणार पालन, टप्प्याटप्प्यानं विद्यार्थ्यांना शाळेत बोलविण्याच्या शिक्षण विभागाच्या सूचना.
▪️सरकारने मराठा समाजासाठी घेतलेल्या निर्णयांची तात्काळ अंमलबजावणी करावी, अन्यथा स्थगित केलेला लढा पुन्हा सुरु करण्याचा संभाजीराजे छत्रपतींचा राज्य सरकारला इशारा.
▪️डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याकांड प्रकरणातील आरोपी विक्रम भावेला हायकोर्टाकडून दिलासा, जामीनातील कठोर अटी-शर्तीतून तीन आठवड्यांची सूट.
▪️शरद पवार हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहेत. त्यांचा पक्ष वाढविण्याचा त्यांना अधिकार आहे. शरद पवार आमच्यावर नाराज नाहीत; भाजपाकडून सरकार अडचणीत आणण्याचा प्रयत्न : नाना पटोले
▪️नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे घेण्यात येणाऱ्या जेईई मेन्सच्या चौथ्या सेशनसाठीच्या परीक्षेसाठीचे प्रवेशपत्रक जारी. चौथ्या सेशनच्या परीक्षा आता 26 व 27 जुलै, 31 ऑगस्ट, 1 सप्टेंबरआणि 2 सप्टेंबरला होणार.
▪️ITI Admission 2021 | आयटीआयसाठी प्रवेशप्रक्रिया सुरु, 966 आयटीआयमध्ये 1 लाख 36 हजार जागा, मंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते प्रवेश प्रक्रियेचा प्रारंभ.
▪️शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी.. ऑनलाईन पिकविमा भरण्यासाठी २३ जुलै २०२१ पर्यंतची मुदतवाढ. राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे, तसेच रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या मागणीला केंद्राचा सकारात्मक प्रतिसाद

टिप्पण्या