*होमगार्ड विभागात लवकरचं भरती 2022*

.                                                                                                                                                                      

*होमगार्ड विभागात लवकरचं भरती 2022*
मुंबई : महासमादेशक कार्यालयाकडून सर्व जिल्हा होमगार्ड कार्यालयातील जीर्ण वाहनांचा आढावा घेऊन त्यावर कार्यवाही करुन शासकीय नियमानुसार लिलावाने विक्री करुन त्याबाबतचा सविस्तर अहवाल 30 दिवसांमध्ये मुख्यालयास सादर करणे बाबत जिल्हा कार्यालयाला कळविण्यात आले होते. तथापि जिल्हा होमगार्ड कार्यालयाकडून त्या कालावधीत अहवाल प्राप्त झाला नाही. अहवाल दि.४ मे पर्यंत मुख्यालयास सादर करणे बाबत कळविण्यात आलेले होते. (Homeguard Bharti 2022)


 

 
परंतु अद्याप जिल्हा कार्यालयाकडून याबाबत कोणतीही कार्यवाही केल्याचे दिसून आले नाही. मुख्यालयाकडून वारंवार कळवून ही याबाबत जिल्हा कार्यालयाकडून कार्यवाही होत नाही ही अत्यंत गंभीर बाब आहे. होमगार्ड संघटनेतील वाहनांचा आढावा घेऊन अहवाल तात्काळ सादर करण्याबाबत वारंवार शासनाकडुन विचारणा होत आहे. (Maharashtra Homeguard Bharti 2022)


 

 
शासकनाकडून पदांचा आढावा मंजूर करण्यात आलेला असून रिक्त वाहन चालकांची पदे भरण्याची कार्यवाही मुख्यालयाकडुन सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे होमगार्ड विभागात लवकरच भरती होणार आहे. तसेच सद्यस्थितील होमगार्ड विभागाकडे वाहने हि 15 वर्षापेक्षा जास्त जुनी झाली असल्याने नवीन वाहनांची विभागास आवश्यकता आहे. जिल्हा कार्यालयातील वाहनांची लीलावाने विक्री करुन त्यासंबंधीचा अहवाल मुख्यालयास दि. १५ जूनच्या आत पाठविण्यात कळविले आहे. जेणेकरुन नवीन वाहन खरेदी प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करता येईल. असे होमगार्ड जिल्हा कार्यालयाला कळविले आहे. (Homeguard Recruitment 2022

टिप्पण्या