कधीतरी आपल्याला अचानक पैशांची गरज भासते आणि तुम्हाला बँकेकडून जास्त व्याजदराने कर्ज घ्यावे लागते. ते आपण घेतो ही पण तो पैसा आपल्या बँकेत जमा होतो आणि तो आपल्याला काढण्यासाठी बँकेच्या दारी खेटा घालाव्या लागतात किंवा आपल्याला चेक दिला जातो तो वठवण्यासाठी तरी बँकेत जावे लागते. पण आता तर एक नवीन पर्याय आहे जो आपल्यासाठी वरील पैकी काहीही न करता तयार झाला आहे. ज्याद्वारे तुम्ही लोकांना 1 लाख रुपयांपर्यंतची रक्कम त्वरित मिळवू शकता. गुगल चा उद्देश जगाची माहिती आपल्या पर्यन्त व्यवस्थित पोहोचविणे आणि ती प्रत्येकासाठी योग्यरीत्या उपयुक्त बनवणे हा आहे. शोध, नकाशे, जीमेल, अण्ड्रोइड, गुगल पे, क्रोम आणि यू ट्युब सारखी उत्पादने आणि प्लॅटफॉर्म असलेल्या अब्जावधी लोकांच्या दैनंदिन जीवनात गुगल हे एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावते आणि ती जगातील सर्वात प्रसिद्ध कंपन्यांपैकी एक बनली आहे. हे तर आपण जाणताच.
गुगल पे अॅपद्वारे पारदर्शक आणि सहज क्रेडिट :-
भारतातील गुगल पे चे ग्राहक आता पेमेंट सेवेच्या अॅपद्वारे वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करू शकतात आणि ते कर्ज मिळवू शकतात. गुगल पे ने गुगल पे वापरकर्त्यांना “पारदर्शक आणि सहज क्रेडिट” प्रदान करण्याच्या उद्देशाने डिएमआय फायनान्स या भारतीय डिजिटल फायनान्स कंपनीच्या सहकार्याने कर्ज सेवा सुरू केली आहे. डिएमआय फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड ने गुगल पे वापरकर्त्यांना सुरक्षित क्रेडिट प्रदान करण्यासाठी गुगल पे वर वैयक्तिक कर्ज उत्पादन प्रदान करण्याची घोषणा केली. हे उत्पादन गुगल पेच्या ग्राहकांना फायदेशीर असणार आहे. डिएम आय आपल्या ग्राहकांना डिजिटल कर्ज वितरण करण्याबरोबरच आपले ग्राहक अशा पद्धतीने वाढवत आहे. जेणेकरून नवीन-क्रेडिट वापर करणार्यांना त्या पटीत आपल्याकडे खेचण्यास मदत होईल.
डिजिटल फायनान्स उपक्रम :-
डीएमआय हे डिजिटल ग्राहक आणि एमएसएमई कर्ज, गृह वित्त, घाऊक वित्त आणि मालमत्ता व्यवस्थापन यामधील प्रमुख व्यवसायांसह संपूर्ण भारतातील क्रेडिट प्लॅटफॉर्म आहे. याची स्थापना २००८ मध्ये करण्यात आली होती आणि भारतातील ४० ठिकाणी पसरलेल्या अत्यंत अनुभवी टीमद्वारे समर्थित आहे. ही एक टेक-फर्स्ट बँक आहे ज्यामध्ये उद्योग-अग्रणी डिजिटल फायनान्स उपक्रम आहेत. जागतिक संस्थात्मक गुंतवणूकदार, धोरणात्मक कौटुंबिक कार्यालये, महत्त्वाच्या बँका आणि भारतातील सार्वजनिक बाजार कर्जदार या सर्वांनी त्याला पाठिंबा दिला आहे. ही योजना प्रत्येकी १ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज प्रदान करेल, जास्तीत जास्त ३६ महिन्यांत परतफेड करता येईल. हे सहयोग १५,००० हून अधिक पिन कोडमध्ये सादर केले जाईल. कंपनीने परिभाषित केलेल्या निकषांवर आधारित डीएमआय फायनान्शियल पात्र वापरकर्त्यांना पूर्व-पात्र बनवते आणि आपल्या उत्पादनाची मागणी त्यांना गुगल पे द्वारे उपलब्ध करून दिली जाते. या वापरकर्त्यांच्या अर्जांवर जवळपास रिअल-टाइममध्ये प्रक्रिया केली जाण्याची शक्यता आहे. आणि त्यांना त्यांच्या बँक खात्यांमधील निधीमध्ये त्वरित प्रवेश घेता येईल. गुगल पे वरून कर्ज मिळवण्यासाठी तुम्हाला या सर्व अॅप्सच्या मूळ कंपनीकडून कर्ज घ्यावे लागेल. यासोबतच ग्राहकाचा सिबिल स्कोर ७०० च्या वर असावा आणि त्यासोबत तुमच्याकडे पॅन कार्ड आणि आधार कार्ड देखील असायला हवे.
डिजिटल फायनान्स इकोसिस्टममधील प्रमुख सहभागींच्या सहकार्याने नाविन्यपूर्ण डिजिटल आर्थिक उत्पादने विकसित करण्याची डीएमआय ची वचनबद्धता गुगल पे चा वापर करणार्यांसाठी एकात्मिक वैयक्तिक कर्ज प्रवास सुरू करून सुरू केलेली आहे.
डिएमआय फायनान्स लिमिटेडचे सहकार्य :-
गुगल पे ने डिएमआय फायनान्स लिमिटेड (DMI) सोबत हातमिळवणी करून पर्सनल लोनची ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ही एक अतिशय सोपी आणि झटपट (डिजिटल पर्सनल लोन) कर्ज मिळवून देणारी सुविधा आहे. गुगल पे आणि डिएमआय फायनान्स लिमिटेड कडून ग्राहक सहजपणे या झटपट कर्ज मिळविण्याचा लाभ घेऊ शकतात.
टिप्पण्या