महिला शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी मिळणार 50% अनुदान , असा करा अर्ज

महिला शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी मिळणार 50% अनुदान , असा करा अर्ज.          मंडळी शेती म्हणजेच खऱ्या अर्थानं आयुष्याचं समाधान. पण आधुनिक शेतीसाठी लागणारी यंत्रसामग्री, विशेषता ट्रॅक्टरसारखी महागडी साधनं, अनेक शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेरची ठरतात. गरीब आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना ही साधन विकत घेणं शक्य होत नाही आणि त्यामुळे त्यांची स्वप्नं अपूर्णच राहतात. मात्र आता ही परिस्थिती बदलू पाहतेय. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत, राज्य सरकारच्या सहकार्याने शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी ५० टक्क्यांपर्यंत अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  www.proworkservices.in.   या कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी केंद्र सरकारने सुमारे २०४ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यामध्ये केंद्राचा ६० टक्के आणि राज्याचा ४० टक्के हिस्सा असून, अनुक्रमे १२२.४८ कोटी रुपये आणि ८१.६५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. योजनेचा मुख्य उद्देश अनुसूचित जाती-जमाती, महिला शेतकरी आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना प्राधान्य देऊन त्यांना आधुनिक शेतीसाठी सक्षम करणे आहे.   

कोण किती अनुदानासाठी पात्र?

या योजनेत अनुसूचित जाती, जमातीच्या महिला शेतकऱ्यांना ट्रॅक्टरच्या एकूण किंमतीच्या ५० टक्के किंवा १.२५ लाख रुपये (जे कमी असेल ते) इतकं अनुदान मिळणार आहे. सर्वसामान्य प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी हे प्रमाण ४० टक्के किंवा १ लाख रुपये इतकं असेल.

अर्ज प्रक्रिया आणि अटी

या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज महाडीबीटी (mahadbt.maharashtra.gov.in) पोर्टलवर करता येणार आहे. अर्ज करताना शेतकऱ्याच्या नावावर किमान ०.४० हेक्टर शेती असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे, मागील पाच वर्षांमध्ये त्यांनी ट्रॅक्टर खरेदीसाठी कोणतेही अनुदान घेतलेलं नसावं.  

निधीचा वर्गवारीनुसार वाटप

या योजनेसाठी मंजूर निधीचा वापर विशिष्ट गटांनुसार पुढील प्रमाणे केला जाणार आहे — सर्वसामान्य शेतकरी गटासाठी १६४.२३ कोटी रुपये, अनुसूचित जातींसाठी २२.२७ कोटी रुपये आणि अनुसूचित जमातींसाठी १७.६३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.   

शेतीसाठी नवी दिशा

ट्रॅक्टरसारखं आधुनिक यंत्र वापरल्यामुळे शेतकरी पेरणी, नांगरणी आणि काढणी यांसारख्या कामांमध्ये वेळ आणि श्रम वाचवू शकतात. ही योजना शेतकऱ्यांना आर्थिक मदतीबरोबरच आधुनिक शेतीकडे वाटचाल करण्याची संधीही देणार आहे.

अर्ज लवकर करा

या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी वेळ वाया न घालवता लवकरात लवकर महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावा. निधी मर्यादित असल्यामुळे लवकर अर्ज करणाऱ्यांना प्राधान्य दिलं जाणार आहे.

शेतीसाठी ट्रॅक्टर मिळवणं हे अनेक शेतकऱ्यांचं स्वप्न होतं. केंद्र सरकारने घेतलेला हा निर्णय या स्वप्नाला मूर्तरूप देणारा ठरेल. त्यामुळे आता शेती अधिक सुलभ, फायदेशीर आणि आधुनिक होण्याच्या दिशेने पुढे जाणार आहे. नोकरी जाहिरात s.in

टिप्पण्या